चिक्कोडी : समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांचा अवमान करण्यात आल्याच्या विरोधात चिक्कोडी येथे कुरबर समाजाच्यावतीने आंदोलन छेडण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिवीर संगोळी रायन्ना, विश्वगुरू बसवेश्वर यांच्या प्रतिमांचा अवमान आणि विटंबना करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज चिक्कोडी तालुका कुरबर संघाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. राष्ट्रपुरुषांच्या अवमान करणार्या दुष्कर्म्यांना अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा आग्रह या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला. चिक्कोडी प्रवासी मंदिरापासून सुरु झालेल्या निषेध मोर्चाचे बसव चौकापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत पोहोचला. यानंतर चिक्कोडी तहसीलदार नेमिनाथ गेज्जे यांना निवेदन सादर करून शासन दरबारी मागणी पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले. या आंदोलनात किरण गुडसे, लक्ष्मण निंगेर, शिवू मरयायी, वसंत कुरबर, रामा बन्नट्टी, राहुल पुजारी, सिद्राम गडदे, लक्ष्मण पुजारी, वसंत कुरबर आदींसह अनेकजण उपस्थित होते.
Check Also
सदलग्यात शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवरील वक्फच्या नोंदी काढण्यासाठी मोर्चा
Spread the love सदलगा : येथील कांहीं शेतकऱ्यांच्या शेतजमिनींच्या उताऱ्यांवर वक्फच्या नोंदी अचानकपणे कर्नाटक सरकारकडून …