शॉच्या खेळीनंतर धवन, किशनची अर्धशतके
कोलंबो – सलामीवीर पृथ्वी शॉ याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीनंतर कर्णधार शिखर धवन, इशान किशन व सूर्यकुमार यादव यांच्या सहजसुंदर अर्धशतकी खेळीच्या जोरावर तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 7 गडी राखून सहज पराभव केला व मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
श्रीलंकेने उभ्या केलेल्या 263 धावांचा पाठलाग करताना भारताकडून पृथ्वी शॉने 43, इशान किशनने 59, मनीष पांडेने 26, शिखर धवनने नाबाद 86 तर सूर्यकुमार यादव नाबाद 31 धावा केल्या. श्रीलंकेकडून धनंजय डीसील्व्हाने 2, तर लक्षण संदकनने 1 गडी बाद केला.
तत्पूर्वी, आर. प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार दासुन शनाका, चमिका करुणारत्ने यांनी दिलेल्या योगदानाच्या जोरावर लंकेने टीम इंडियासमोर 50 षटकात 9 बाद 262 धावा केल्या.
भारताकडून दीपक चहर, कुलदीप यादव आणि यजुर्वेंद्र चहल यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.