बेळगाव : छत्रपती शिवाजी युवक मंडळ आणि शिवाई देवी महिला मंडळ, माळी गल्ली- बेळगाव यांच्यावतीने डेंग्यू व चिकुनगुनिया प्रतिबंधक लसीकरण शिबिर आयोजिण्यात आले होते.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून शिबिराला चालना दिली. यावेळी बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी युवक मंडळाच्या लोकोपयोगी उपक्रमांचे कौतुक केले. हे मंडळ सातत्याने सेवाभावी उपक्रम हाती घेत असल्याचे ते म्हणाले. सामाजिक कार्यकर्ते रवींद्र जाधव यांनी, सातत्याने लोकहिताचे उपक्रम राबवणाऱ्या छत्रपती शिवाजी मंडळ आणि शिवाई देवी महिला मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. गल्लीतील नागरिकांनी संघटित होऊन गल्लीच्या विकासासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही जाधव यांनी केले.
सामाजिक कार्यकर्ते अर्जुन शिंदे आणि भाऊराव चौगुले यांनी किरण गावडे आणि रवींद्र जाधव यांचा गुलाब पुष्प आणि मिठाई देऊन सन्मान केला. छत्रपती शिवाजी युवक मंडळाचे अध्यक्ष मेघन लंगरकांडे यांच्या नेतृत्वाखाली लसीकरण शिबीर उपक्रम राबवण्यात आले. लसीकरण शिबिराचे हे सहावे वर्ष होते.
किरण गावडे व रवींद्र जाधव यांच्या हस्ते लहान मुलांना लस पासून लसीकरण शिबिराला चालना देण्यात आली. गल्ली आणि परिसरातील सुमारे 300 हून अधिक जणांना लस पाजण्यात आली.
याप्रसंगी प्रभाकर बामणेकर, अभिजीत लंगरकांडे, प्रकाश पाटील, विनोद लोहार, अनुराधा चौगुले, मनीषा काकडे, सुनीता कदम, प्रेमा बामणेकर, ललिता गायकवाड, कल्पना ठोकणेकर, सुजाता शिंदे यासह युवक मंडळ आणि महिला मंडळाच्या सदस्य उपस्थित होत्या.