Monday , December 4 2023

गोवा बनावटीची दारू जप्त : चौघे गजाआड

Spread the love

बेळगाव : टाटा हेस्का गाडीतून बेकायदा वाहतूक करण्यात येत असलेली सुमारे 15 लाख 35 हजार रुपये किंमतीची 9 बॉक्स गोवा बनावटीची दारू आज अबकारी खात्याने जप्त केली. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.
आनंद राजू कोप्पद (रा. गोकाक), चिदानंद अर्जुन बिरडी (रा. वडरट्टी), यमनाप्पा बागेवाडी (रा. तुक्कणट्टी) आणि शानुर मेहबूब करीपल्ली (रा. गोकाक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नांवे आहेत.
हे चौघेही टाटा हेस्का चारचाकी वाहनातून गोव्याच्या विनापरवाना दारूची वाहतूक करत असल्याची माहिती मिळताच अबकारी खात्याचे अधीक्षक विजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली गोकाकचे निरीक्षक शंकरगौडा पाटील यांनी आज मंगळवारी दुपारी मुडलगी तालुक्यातील संगणकेरी क्रॉस येथे सापळा रचून उपरोक्त कारवाई करताना चौघा जणांना अटक केली.
या कारवाईत टाटा हेस्का गाडीतील इंपिरियल ब्लू, मेगडॉल, रॉयल स्टॅग या दारूच्या बाटल्यांचे 9 बॉक्स जप्त करण्यात आले. सदर एकूण 72.62 लिटर दारूची बाजारातील किंमत 15 लाख 35 हजार रुपये इतकी होते.
अबकारी खात्याचे आयुक्त मंजूनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली सदर दारू जप्तीची कारवाई करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.

About Belgaum Varta

Check Also

बॉम्ब धमकी प्रकरणी विशेष तपास पथक; ७० एफआयआर नोंद

Spread the love  बंगळूर : बॉम्ब धमकी प्रकरणी शहरात ४८ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *