Monday , December 4 2023

निपाणी नगरपालिका कर्मचार्‍यांना मास्क, सॅनिटायझरचे वितरण

Spread the love

निपाणी : कोरोनाच्या महामारीतही निपाणी शहर स्वच्छ व सुरक्षित ठेवून शहरवासीयांच्या आरोग्याची काळजी घेणार्‍या सफाई कामगार व नगरपलिका कर्मचारी हे प्रथमदर्शी कोरोना योद्धे म्हणून काम करत आहेत. त्याची दखल घेऊन कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या सहकार्याने ’आपले पालिका कर्मचारी, आपला अभिमान’ अंतर्गत चिकोडी जिल्हा काँग्रेस व निपाणी विधानसभा काँग्रेस यांच्याकडून नगरपालिका कर्मचार्‍यांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
नगरपालिकेतील आरोग्य अधिकारी विवेक जोशी, अभियंते स्वानंद तोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्या हस्ते या किटचे वितरण झाले. लक्ष्मण चिंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. विवेक जोशी यांनी आरोग्य आणि स्वच्छता विभागातील कर्मचार्‍यांना सदरचे किट उपयुक्त असून यापुढील काळातही नागरिकांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन केले.
यावेळी श्रीनिवास संकपाळ, माजी नगरसेवक संदीप चावरेकर, संदीप इंगवले, बाळासाहेब कमते, प्रदीप सातवेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

एस. बी. पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

Spread the love  निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता.कागल) येथील येथील मोहनलाल दोशी विद्यालयात ३१ वर्षे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *