बेळगाव : शहापूर आळवण गल्ली येथे नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, ज्योती लक्ष्मीकांत यल्लारी (वय 19) असे संशयास्पद मृत्यू झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे. मुचंडी येथील लक्ष्मीकांत यल्लारी (वय 23) याच्याशी बसवाण गल्ली शहापूर येथील ज्योती पोळ हिच्याशी नोंदणी पद्धतीने तीन महिन्यांपूर्वी आंतरजातीय प्रेम विवाह झाला होता. लग्नानंतर हे दोघे आळवण गल्ली शहापूर येथे एका चाळीत भाड्याच्या खोलीत राहत होते. लग्नानंतर या दोघांमध्ये सतत भांडण होत होते.
काल रात्री ज्योतीचा अचानक मृत्यू झाल्याने ज्योतीच्या माहेरच्या लोकांनी तिच्या नवऱ्यानेच खून केला असावा असा संशय व्यक्त केला. यासंबंधी मृत ज्योतीच्या मामाने उमेश कदमने सांगितले की ज्योतीला तिच्या नवऱ्यानेच मारले आहे.
शहापूर पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.