आम. अंजली निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर
खानापूर (प्रतिनिधी) : पणजी बेळगाव महामार्गावरील खानापूर- रामनगर महामार्गासाठी डॉ. अंजली निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी पणजी बेळगाव महामार्गावरील गोवाक्राॅसवरील पाटील गार्डन येथे रास्तारोको करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ. अंजली निंबाळकर म्हणाल्या की, गेल्या कित्येक वर्षांपासून खानापूर रामनगर महामार्गाच्या रस्त्याची दैयनिय आवस्था झाली आहे. यासाठी भाजपच्या केंद्र सरकारने व राज्य सरकारने या रस्त्याचे काम त्वरीत सुरू करावे. या मागणीसाठी शनिवारी दि. ३ रोजी रास्तारोक करत आहे.
यावेळी भाजप सरकारने खानापूर रामनगर महामार्गासाठी १० कोटी रूपयाचा निधी मंजुर केल्याची डरकाळी केली होती. मात्र केवळ खानापूर रामनगर महामार्गासाठी फक्त ४ कोटी ९२ लाखाचे टेंडर पास झाले आहे. मग उर्वरित ५ कोटीचा निधी भाजप नेत्यानी खाल्ला का? असा सवाल आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी गोवाक्राॅसवरील रास्तारोको करतेवेळी बोलुन दाखविले.
यावेळी त्या बोलताना म्हणाल्या, खानापूरात भाजप नेत्यांनी प्रसारमाध्यमांना खानापूर रामनगर महामार्गासाठी १० कोटीचा निधी मंजूर झाला असुन लवकरच कामाला सुरुवात होईल असे सांगितले.
मात्र प्रत्यक्षात खानापूर रामनगर महामार्गाच्या ५२ किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी केवळ ४ कोटी ९२ लाख रूपये टेंडर पास केले आहे. तेव्हा ५२ किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी ४ कोटी ९२ रूपये निधी कसा होणार. मग उर्वरित निधी गेला कुठे की भाजप नेत्यानी गिळंकृत केला असा आरोप यावेळी त्यांनी केला.
रास्तोरोकोला सकाळी १० वाजल्यापासून पणजी बेळगाव महामार्गाच्या गोवा क्राॅसवरील पाटील गार्डनसमोर सुरूवात झाली.
यावेळी तहसीलदार रेश्मा तालिकोटी, सीपीआय सुरेश सिंगे यांनी पोलिस फाट्यासह रास्ता रोको ठिकाणी धाव घेतली.
रास्ता रोकोला तालुका काँग्रेसचे ब्लाॅक अध्यक्ष महादेव कोळी, अनिता दंडगल, महांतेश राऊत, ऍड. ईश्वर घाडी, गीता अंबरगट्टी, मधुकर कवळेकर, गंगाराम गुरव, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रारंभी खानापूरपासून गोवा क्राॅसवरील पाटील गार्डनपर्यंत पायी रॅली काढण्यात आली. यावेळी भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करून परिसर हादरून सोडला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन सादर करून येत्या सात दिवसात महामार्गाची दखल घेऊन लागलीच रस्त्याचे सुरू करावे अशी मागणी निवेदनाव्दारे केली.