बेळगाव (प्रतिनिधी) : बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक करणाऱ्या एका वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या जवळून दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी सकाळी गणेशपूर रोड येथे करण्यात आली. यामध्ये एकूण 182 बाटल्यांचा साठा जप्त करण्यात आला. याची किंमत एकूण 50 हजार रुपये इतकी होते.
अनिल नारायण धामणे (वय 28) रा. ढोर गल्ली असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. हा मारुती सुझुकी बलेनो या कारमधून गोव्याहून 750 एम.एल. च्या 182 दारूच्या बाटल्या बेळगावला विक्रीसाठी घेऊन येत होता. याची माहिती पोलिसांना मिळताच तपासणी केली असता विनापरवाना दारू घेऊन येत असल्याचे आढळून आले.
यामध्ये रॉयल स्टेग, फेनी, मॅकडॉल रम, हायवर्ड व्हिस्की, मॅजीक मोमेंट, ओल्ड अँड ब्लॅक रम अशा प्रकारची दारू यामध्ये आढळून आली.
कॅम्प पोलिस निरीक्षक धर्मट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई करून विनापरवाना दारू जप्त करून युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली.