तेऊरवाडी (एस. के. पाटील) : सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड मधील अनेक कर्मचाऱ्यांच्या कोरोना कामाकडे ड्यूट्या लावल्या आहेत. याचा परिणाम बांधकाम विभागाची अनेक कामे प्रलंबित आहेत.
वेगवेगळ्या फंडातून तालुक्यातील अनेक गावात विविध कामे मंजूर झाल्याचे जाहिर करण्यात आले आहे. पण या कामांच्या पुर्ततेसाठी इतर कागदपत्रे पूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी अनेक जन बांधकाम विभागाच्या चंदगड कार्यालयात येरझाऱ्या मारत आहेत. पण अधिकारी वर्ग कोरोना कामात व्यस्त असल्याने कागदपत्रे पूर्ण करण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. आमदार फंड व जिल्हा परिषद फंडातून मंजूर झालेल्या कामांचे एस्टीमेंन्ट तात्काळ होणे गरजेचे आहे. समोर पावसाळा चालू होणार असल्याने या काळात मंजूर कामे करताना अडचणी येऊ शकतात. या सर्वाचा विचार करून आठवडयातील काही दिवस तरी अधिकारी वर्गाने कार्यालयीन कामकाज पाहणे गरजेचे बनले आहे. शासनाने याचा विचार करून संबंधीत अधिकाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी आदेश द्यावेत म्हणजे या कामाना गती मिळेल.
Check Also
अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला
Spread the love मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला आहे. वांद्रे …