Sunday , September 20 2026
Breaking News

कोविड सेंटर लोकार्पण सोहळा संपन्न

Spread the love

चंदगड (प्रतिनिधी) : कोरोना महामारीमुळे संपूर्ण जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी अंजुमन–ए–इस्लाम चॅरिटेबल ट्रस्ट चंदगडच्यावतीने लोकनेते स्वर्गीय नामदार बाबासाहेब कुपेकर कोविड विलिगीकरण कक्ष लोकार्पण सोहळा कोरोना बाबतीतचे सर्व नियम पाळून संपन्न झाला.

यावेळी प्रातांधिकारी विजया पांगारकर, नगराध्यक्ष सौ. प्राची दयानंद काणेकर, शिवसेना जिल्हा संघटक संग्रामसिंह कुपेकर यांच्या शुभहस्ते फित कापून कोविड सेंटर रूग्ण सेवेसाठी खुलं करण्यात आले. या कार्यक्रमासाठी तहसीलदार विनोद रणावरे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी अभिजीत जगताप, पंचायत समिती सभापती अनंत कांबळे, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, तालुका आरोग्याधिकारी डॉ. आर. के. खोत, जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, उद्योजक तथा कोरोना योद्धा डाॅ. सुनिल काणेकर, राजेद्र परीट नगरसेवक मेहताब नाईक नगरसेवक, आनंदा हळदणकर उर्दु हायस्कूलचे सेक्रेटरी दस्तगीर  आगा कलीम मदार, प्रमोद कांबळे, मुस्लिम समाज अध्यक्ष  मुल्ला, राष्ट्रवादी महिला चिटणीस सौ. प्रमीला पाटील, अशोक  दाणी तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी, समाजसेवी, नगरसेविका व इतर मान्यवर उपस्थित होते. अलताफ मदार, सल्लाऊद्दीन नाईकवाडी, शब्बीर बेपारी, अल्लाउद्दीन सय्यद, नियाज मदार, मोहसीन पटेकरी, आरीफ खेडेकर, खलील अहमद अल्लाखान, सलीम नाईकवाडी व इतर मान्यवर संचालक उपस्थित होते. सद्या २५ बेड उपलब्ध आहेत तर वेळी एकूण ५० बेडचे नियोजन केले जाईल असे सांगितले. विरंगुळा कक्ष, चहा नाश्ता, जेवणसह मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
शेवटी ट्रस्टचे अध्यक्ष तजमुल फणीबंध यांनी आभार  मानले.

About Belgaum Varta

Check Also

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील एसएनसीयूमध्ये भीषण आग; तीन नवजात बालकांचा मृत्यू

Spread the love  अमरावती : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील नवजात शिशू अतिदक्षता विभागात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *