बेळगाव : कोरोनाच्या घातक डेल्टा प्लस या रूपांतरित विषाणूची भीती बेळगावातही उदभवली आहे. १५ संशयित कोरोना रुग्णांचे नमुने तपासणीसाठी बेंगळूरच्या लॅबला पाठविण्यात आले आहेत.
महाराष्ट्र, कर्नाटकासह देशाच्या ८ राज्यांत डेल्टा प्लसची प्रकरणे आढळून आल्याने खबरदारी घेण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. याच दरम्यान, बेळगावातही आता डेल्टा प्लस व्हायरसची दहशत पसरली आहे. १५ संशयित कोरोना रुग्णांचे नमुने तपासणीसाठी बेंगळूरच्या लॅबला पाठविण्यात आले आहेत. कोरोनाच्या तीव्रतेच्या आधारे हे नमुने घेण्यात आले असून पुढील तपासणीसाठी बेंगळूरच्या निम्हान्स आणि एनसीबीएस लॅबला पाठवून देण्यात आले आहेत.
बिम्सने सिक्वेन्सिंग केलेल्या नमुन्यांचा तपासणी अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे. सरकारच्या सूचनेनुसार १५ जणांचे सिक्वेन्सिंग केले असून, नमुने तपासणीसाठी पाठवल्याचे बिम्सचे संचालक डॉ. उमेश कुलकर्णी यांनी सांगितले.