Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

मुख्यमंत्र्यांच्या उत्तरादरम्यान विरोधकांचे धरणे, सभात्याग कागदपत्रे फाडून संताप व्यक्त

  बंगळूर : विधानसौधमध्ये पाकिस्तान समर्थक घोषणा देणाऱ्यांना हजर करावे, या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्य सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी करत काल विधानसभेत आंदोलन सुरू ठेवलेल्या भाजप आमदारांनी आजही धरणे आंदोलन पुढे चालूच ठेवले. सभागृदात कागदपत्रे फाडून सरकारविरोधात घोषणाबाजी केली व मुख्यमंत्र्यांच्या उत्तरादरम्यान सभात्याग केला. आज सकाळी सभागृहाचे कामकाज …

Read More »

बेळगाव शहराजवळ हत्तीचे दर्शन!

  बेळगाव : आज शुक्रवारी सकाळी बेळगाव शहर परिसराजवळील अलतगा, बसव कॉलनी, कंग्राळी (बीके) येथे हत्तीचे दर्शन झाले. हत्ती बसव कॉलनी परिसरात दिसल्याने नागरिकांनी हत्ती पाहण्यासाठी गर्दी केली होती जंगलातून आलेला हत्ती आता महापालिका व्याप्तीपर्यंत पोहोचला आहे. बसव कॉलनी बॉक्साइट रोड परिसरात ज्यावेळी हत्ती दिसला त्यावेळी अनेकांना आनंद झाला तर …

Read More »

बेळगावकडे येणाऱ्या बसची एक्टिव्हाला धडक; मायलेकीचा मृत्यू

  होन्नावर : मंगळूरहून बेळगावकडे येणाऱ्या केएसआरटीसी बस आणि एक्टिव्हा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात आई व मुलगी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी मानकी येथील गुळदकेरीजवळील राष्ट्रीय महामार्गावर घडली. सविता राजू आचारी (वय 40) आणि मुलगी अंकिता (वय 17) राहणार नाडवरकेरी, मावळी मुरडेश्वर या मायलेकीचा अपघातात मृत्यू झाला आहे. मृत …

Read More »