मुंबई : रोहित शर्माच्या पाठोपाठ विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्त घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्याने बीसीसीआयलाही या निर्णयाबद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे विराटच्या या निर्णयानंतर आता तो आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात सहभागी होण्याची शक्यता खूपच कमी आहे.
मात्र असे असले तरी बोर्डाच्या एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याने कोहलीला या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. आता निवड समिती इंग्लंड दौऱ्यासाठी संघ जाहीर करताना कोहलीच्या भविष्याबाबत काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे आहे.
2001 साली पदार्पण
विराट कोहलीने जून 2011 साली किंग्स्टन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्यानंतर कोहलीने पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 15 धावा केल्या. त्याने शेवटचा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे जानेवारी 2025 मध्ये खेळला. या शेवटच्या कसोटीत, कोहलीने पहिल्या डावात 17 धावा आणि दुसऱ्या डावात 6 धावा केल्या.
विराट कोहलीचे क्रिकेट करिअर
123 टेस्ट, 210 इनिंग्स, 9230 रन, 46.85 ॲव्हरजे, 30 शतक, 31 अर्धशतक 302 वनडे, 290 इनिंग्स, 14181 रन, 57.88 ॲव्हरेज, 51 शतक, 74 अर्धशतक, 5 विकेट 125 टी20, 117 इनिंग्स, 4188 रन, 48.69 ॲव्हरेज, 1 शतक, 38 अर्धशतक, 4 विकेट.