Wednesday , June 17 2026
Breaking News

बेळगावमध्ये घरात डांबून ठेवलेल्या महिला आणि मुलांची ‘अक्का पथका’कडून सुटका

Spread the love

 

बेळगाव : पतीकडून घरात डांबून ठेवलेल्या आणि शारीरिक तसेच मानसिक छळाला सामोरे जाणाऱ्या एका महिलेची व तिच्या दोन मुलांची बेळगाव पोलिसांच्या ‘अक्का पथका’ने यशस्वी सुटका केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून पीडितेची सुरक्षित रवानगी केली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी या कारवाईची माहिती दिली. दिल्लीतून आलेल्या एका माहितीच्या आधारे महिला पोलीस ठाण्याच्या माध्यमातून ‘अक्का पथका’चे पथक तातडीने संबंधित ठिकाणी पाठवण्यात आले. या पथकाने घराचा दरवाजा उघडून बंदिस्त असलेल्या महिला आणि तिच्या दोन लहान मुलांची सुटका केली.

दिल्लीहून बेळगावमध्ये आलेल्या या महिलेला तिचा पती घरात डांबून ठेवत होता. सुटका केल्यानंतर पीडितेवर आवश्यक वैद्यकीय उपचार करून तिला तात्पुरता आश्रय देण्यात आला. पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी पतीविरुद्ध महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. महिला आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची विमानाने दिल्लीला रवानगी करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

दिनेश ओऊळकर यांचा लवकरच नागरी सत्कार

Spread the love  बेळगाव : बेळगावचे सुपुत्र व महाराष्ट्र सहकार खात्याचे माजी अतिरिक्त आयुक्त दिनेश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *