Wednesday , June 17 2026
Breaking News

प्रादेशिक आयुक्त कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

Spread the love

 

बेळगाव : जमिनीचे बिगरशेतीमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींमुळे एका व्यक्तीने बेळगावच्या प्रादेशिक आयुक्त कार्यालयात गुरुवारी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

हावेरी जिल्ह्यातील राणेबेन्नूर येथील रुद्रय्या अम्मिनबावीमठ (५०) असे या व्यक्तीचे नाव आहे. आपली दोन एकर जमिनीचे बिगरशेतीमध्ये रूपांतर करण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता आणि त्यासाठी ते गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या मारत होते. हावेरी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केल्यानंतर, ‘रस्त्याची रुंदी’ बदलल्याशिवाय जमिनीचे बिगरशेतीमध्ये रूपांतर करणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. याच कामासाठी रुद्रय्या यांनी बेळगावच्या प्रादेशिक आयुक्त कार्यालयात अनेकदा भेटी देऊन विनंती केली होती. गुरुवारी ते पुन्हा प्रादेशिक आयुक्त जानकी यांची भेट घेण्यासाठी आले होते. मात्र, आयुक्त कार्यालयात उपलब्ध नसल्याचे समजताच हताश झालेल्या रुद्रय्या यांनी कार्यालयातच विष प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर त्यांना तातडीने बेळगावच्या बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद मार्केट पोलीस ठाण्यात झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली शिक्षिकेची तब्बल 30 लाखांची ऑनलाइन फसवणूक

Spread the love  बेळगाव : ऑनलाईन काम करून सहज पैसे कमावण्याचे आमिष दाखवत शाहूनगर येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *