Thursday , August 27 2026
Breaking News

अथणीत विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरात गुरुवारी एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला असून, सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा छळ करून खून केल्याचा गंभीर आरोप केला जात आहे.

संगीता गाडीवड्डर असे मृत महिलेचे नाव आहे. संगीताचा विवाह व्यंकटेश गाडीवड्डर याच्याशी झाला होता. गेल्या काही वर्षांपासून पती आणि सासरच्या लोकांकडून हुंड्यासाठी तिचा छळ केला जात असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.

घर बांधण्यासाठी माहेरून २ लाख रुपये घेऊन येण्यासाठी पती व्यंकटेश संगीतावर सतत दबाव टाकत होता. पैसे देण्यास असमर्थता दर्शविल्याने घरात वारंवार भांडणे होत होती. पती आणि नणंद संगीताला त्रास देत होते. “केवळ दीड महिन्यातच माझ्या मुलीला मारहाण करून संपवले आहे, माझ्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा होऊन आम्हाला न्याय मिळावा,” अशी मागणी संगीताची आई कस्तूरी यांनी केली आहे. “व्यंकटेश वारंवार पैशांची मागणी करत असे. तसेच तिचा खून करून आत्महत्या केल्याचा बनाव रचत असल्याचा आरोप मृत महिलेच्या बहिणीने केला आहे. आपल्या बहिणीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आहेत. माझ्या बहिणीच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या पतीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मृत महिलेच्या आणखी एका बहिणीने देखील सासरच्या मंडळींवर आरोप करत वयाने लहान असलेल्या आपल्या बहिणीवर सातत्याने तिच्या पतीकडून शारीरिक छळ केला जायचा आणि याच माध्यमातून तिला बेदम मारहाण करून तिचा जीव घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच अथणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. हा प्रकार आत्महत्येचा आहे की खून, याचा तपास पोलीस करत असून शवविच्छेदन अहवालानंतर सत्य समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

About Belgaum Varta

Check Also

अंबोली घाटात दरड कोसळली; बेळगाव – सिंधुदुर्ग वाहतूक विस्कळीत

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध अंबोली धबधब्याजवळ मंगळवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *