Thursday , August 27 2026
Breaking News

बोरगांव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी रुक्साना अफराज यांची बिनविरोध निवड

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा भारती वसवाडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या बोरगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदासाठी गुरुवारी (ता.३०) झालेल्या निवडणुकीत रुक्साना अफराज यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार सुरेश मुंजे यांनी काम पाहिले.
बोरगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदासाठी निवडणूक आयोगाकडून ओबीसी ‘अ’ आरक्षण जाहीर झाले होते. सुकाणू समितीच्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात उपनगराध्यक्षा भारती वसवाडे यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर उर्वरित कालावधीसाठी ही निवड प्रक्रिया राबविण्यात आली. याप्रसंगी सहकाररत्न उत्तम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. निवडीनंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.नगरपंचायतीच्या एकूण १७ पैकी १६ जागांवर उत्तम पाटील गटाचे वर्चस्व असल्याने उपनगराध्यक्ष पदासाठी रुक्साना आफराज यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे सदर निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी सुरेश मुंजे यांनी केली.
यावेळी उत्तम पाटील यांनी दिवंगत सहकाररत्न रावसाहेब पाटील (दादा) यांच्या नेतृत्वाखाली नगरविकास पॅनलमधून १७ पैकी १६ नगरसेवक निवडून आले आहेत. या विश्वासाबद्दल शहरवासीयांचे मनापासून आभार व्यक्त करून बोरगाव शहराचा सर्वांगीण विकास करून ते आदर्श शहर बनवण्याचा आमचा मानस आहे. मागील पाच वर्षांत बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक विकासकामे बोरगाव येथे राबविण्यात आली असून पुढील काळातही सर्वांच्या सहकार्याने विकासकामांना गती देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
नूतन उपनगराध्यक्ष रुक्साना अफराज यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. निवडीनंतर फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी नगराध्यक्ष दिगंबर कांबळे,
सभापती प्रदीप माळी,नगरसेवक अभय मगदूम, पिंटू कांबळे, जावेद मकानदार, रोहित माने, तुळशीदास वसवाडे, शोभा हावले, अश्विनी पवार, सुवर्णा सोबाने, वर्षा मनगुते, संगीता शिंगे, गिरीजा वठारे, बाळू अफरांज, अभयकुमार करोले, संगाप्पा ऐदमाळे, रमेश कुरळे, मुख्याधिकारी स्वानंद तोडकर यांच्यासह
नगरपंचायतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शहरातील नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री महात्मा बसेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेतर्फे महात्मा बसवेश्वर, अक्कमहादेवी वचन कंठपाठ, वक्तृत्व वेशभूषा स्पर्धेचे आयोजन

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील चिक्कोडी रोडवरील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *