Thursday , August 27 2026
Breaking News

तालुका शिक्षक संघटनेची उद्या निवडणूक; चौघेजण जण बिनविरोध, रात्री लागणार निकाल

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील कर्नाटक राज्य सरकारी प्राथमिक शाळा शिक्षक तालुका संघटनेची पंचवार्षिक निवडणूकीसाठी शुक्रवार शुक्रवारी (ता.१ ) आहे. येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालय समोरील शाळेत सकाळी ८ ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत मतदान होणार असून त्यानंतर नंतर मतमोजणी होऊन निकाल स्पष्ट होणार आहे. यापूर्वी चार महिला उमेदवारांची बिनविरोध निवड झाली असून उर्वरित ८ जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत.
शिक्षक संघटनेची ही निवडणूक गुरुसेवा व शिक्षकसेवा पॅनलमध्ये होत आहे. केवळ शिक्षक सेवा पॅनेलमधील तीन उमेदवारांमुळे ही निवडणूक लागली आहे.
एकूण ५६३ सभासद मतदा-नासाठी पात्र आहेत. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गुरुसेवा पॅने-लकडून प्रयत्न झाले. मात्र, विरोधी शिक्षक सेवा पॅनेलमधील उमेदवार प्रकाश कदम हे ३ ते ४ जागांवर ठाम राहिले. त्यामुळे गुरुसेवा पॅनेलला उमेदवार जाहीर करावे लागले. निवडणूक अधिकारी म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक टी. एम. भोसले व सहाय्यक म्हणून राहुल कांबळे हे काम पाहत आहेत.
गुरुसेवा पॅनेलमधून भास्कर स्वामी, दीपक मधाळे, फिरोजखान इनामदार, मुबारक जैनापुरे, प्रकाश चव्हाण, संतोष पाटील, सुनील शेवाळे, वाय. टी. पाटील तर शिक्षक सेवा पॅनेलमधून प्रकाश कदम सदाशिव तराळ, शहाजी माने हे निवडणूक लढवीत आहेत.या पॅनेल-मधील शिल्पा भुसाणी यांची महिला गटातून बिनविरोध निवड झाली असून याच पॅनेलमधून भास्कर स्वामी हे सलग तिसऱ्यांदा आपले नशीब अजमवित आहेत.

About Belgaum Varta

Check Also

सांस्कृतिक मूल्यांची संवर्धन करणे आवश्यक

Spread the love  वृषाली हरिहर; कुर्लीत आंतरशालेय कथाकथन स्पर्धा निपाणी (वार्ता) : कला ही केवळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *