Thursday , August 27 2026
Breaking News

सैन्यात भरती झालेल्या जवानांचा उचवडे येथे सत्कार

Spread the love

 

उचवडे : उचवडे (ता.खानापूर) येथील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने गावातील पहिले वहिले सैन्यात भरती झालेले आणि आपले प्रशिक्षण पूर्ण करून सेवेत रुजू झालेले विशाल रघुनाथ पाटील व अनिल आदिनाथ बोंझेर्डेकर या जवानांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
प्राथमिक शाळेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य लक्ष्मणराव बामणे हे होते.
सुरवातीला वाचनालयाचे अध्यक्ष शिवाजी हसनेकर यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून सांगितला व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी सत्कारमूर्ती विशाल पाटील यांचा सत्कार लक्ष्मणराव बामणे यांनी अनिल बोंझुर्डेकर यांचा सत्कार ह.भ.प. धोंडिबा बोंझेर्डेकर यांच्याहस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.या युवकांना ज्यांनी घडविले त्या त्यांच्या आजोबांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला. बाबुराव लक्ष्मण पाटील यांचा सत्कार वाचनालयाचे अध्यक्ष शिवाजी हसनेकर यांच्याहस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. हणमंत बोंझेर्डेकर यांचा सत्कार वाचनालयाचे उपाध्यक्ष ह.भ.प. दशरथ पाटील यांच्याहस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार आला.
याप्रसंगी ग्राम पंचायतीचे माजी सदस्य शाहू पाटील यांचे गुणगौरवपर समयोचित भाषण झाले, तर विशाल पाटील व अनिल बोंझेर्डेकर यांची सत्काराला उत्तर देणारी भाषणणे झाली, तर लक्ष्मणराव बामणे यांचे अध्यक्षीय भाषण भाषण झाले.
प्रा.महादेव खोत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर कल्लापा पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.

About Belgaum Varta

Check Also

कवी चंद्रशेखर गायकवाड यांच ‘कळा या लागल्या जीवा’ कार्यक्रम आणि कवी संमेलनाचे शनिवारी आयोजन

Spread the love  बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने शब्दगंध कवी मंडळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *