Thursday , August 27 2026
Breaking News

कडक उन्हाचा बांधकामालाही फटका; सकाळ, संध्याकाळच्या टप्प्यात कामे

Spread the love

 

निपाणी‌ (वार्ता) : भर उन्हात बांधकामे करणे हे कामगार आणि बांधकाम गुणवत्ता या दोन्ही दृष्टीने आव्हानात्मक ठरत आहे. सध्या शहर आणि परिसरात पहाटे पासून बांधकामांना सुरुवात केली जात आहे. तर दुपारी बारा वाजता काम बंद करून पुन्हा सायंकाळी चार नंतर ही कामे केली जात आहेत. त्यामुळे उन्हाचा बांधकाम व्यवसायावरही परिणाम जाणवत आहे.
साधारण सायंकाळी चारच्या सुमारास सूर्याचा ताप कमी झाला, की पुन्हा पुढचे दोन-तीन तास काम केली जात आहेत. पारा ४१ अंशांच्या आसपास असल्यामुळे ११-१२ ते ३-४ वाजेपर्यंत तीव्र ऊन जाणवत आहे यावेळी काम करणे अशक्य असून घरे,इमारत बांधकामावरचे काम धोकादायकच ठरण्याची ठरत आहे. तीव्र उन्हात उष्माघाताचाही धोका असल्याने बांधकाम मजूर सकाळी साडेसहा सातच्या सुमारासच कामास सुरुवात करत आहेत. दुपारी विश्रांती घेऊन पुन्हा चारच्या सुमारास कामे सुरू करत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील कामेही सकाळी लवकर सुरू केली जात आहेत. उन्हाच्या तीव्रतेमुळे डांबरीकरणाची कामे बऱ्यापैकी बंद आहेत.
भर उन्हात काम करताना कामगारांना चक्कर येणे, डी हायड्रेशन किंवा उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कडक ऊन टाळण्यासाठी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा काम करणे योग्य ठरत आहे. काही ठिकाणी कामगारांसाठी सावली, शीतपेये आणि पुरेशा पिण्याच्या पाण्याची सोय करून बांधकामे केली जात आहेत.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीतील चिमगांवकर गल्लीतील विठ्ठल मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील चिमगांवकर गल्ली,बागवान गल्ली येथील विठ्ठल मंदिरात आयोजित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *