निपाणी (वार्ता) : आधुनिक आणि मोबाईलच्या गतिमान युगात इंग्रजी भाषेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. ही काळाची पावले ओळखून बोरगांव येथील श्री विद्यासागर शिक्षण संस्था संचलित इंग्लिश मीडियम शाळेत नूतन ‘इंग्रजी नर्सरी क्लास’ सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे, असे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, अण्णासाहेब हावले यांनी व्यक्त केले.
बोरगाव येथील विद्यासागर शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मीडियम शाळेत नर्सरी क्लास प्रारंभ महोत्सव पार पडला. या वर्गाचे शानदार उद्घाटन शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब हावले व जीन वाणी महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या संस्थापक अध्यक्षा सुनीता हावले दांपत्याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एल. के. जी. आणि यु.के.जी. च्या वर्गाचे उद्घाटन करून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात आली.
प्रारंभी विद्या मातेच्या प्रतिमेस मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात आला.
मुलांचे मन रमावे म्हणून वर्ग खोल्यांमध्ये विविध प्रकारची खेळणी ठेवण्यात आली आहेत. शाळेच्या प्रवेशद्वारावर बालमित्रांचे स्वागत करण्यासाठी आकर्षक स्वागत कमान उभारण्यात आली होती. यावेळी प्रकाश पाटील, पंपा म्हैशाळे, मुख्याध्यापक राजू खिचडे, संचालक अनुज हवले, ऐश्वर्या हावले, रावसाब तेरदाळे, शिवप्पा माळगे, भाऊसाहेब पाटील यांच्यासह पालक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta