Tuesday , August 18 2026
Breaking News

नूतन मराठी विद्यालयात शैक्षणिक साहित्याचे वितरण

Spread the love

 

निपाणी(वार्ता) : निपाणी येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन मराठी विद्यालय, प्राथमिक व माध्यमिक विभागा मधील विद्यार्थ्यां नासामाजिक कार्यकर्ते सुरेश घाटगे यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एस. पचंडी तर प्रमुख पाहुणे म्हणून यरनाळ मधील सामाजिक कार्यकर्ते सुरेश घाटगे हे होते. नामदेव चौगुले, राजेंद्र घाटगे, गुलाबराव पाटील, दिनकर लाटकर, सुबोध भावे, संभाजी घाटगे, बाळासाहेब घाटगे, प्राथमिकचे मुख्याध्यापक व्ही. एम. बाचणे उपस्थित होते.
गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कुठेही अडथळा येऊ नये, या उद्देशाने सुरेश घाटगे यांनी हा स्तुत्य उपक्रम असल्याचे मुख्याध्यापक एस. एस. पचंडी यांनी सांगितले. नामदेव चौगुले यांनी झाडे लावा झाडे जगवा हा नारा विद्यार्थ्यांना दिला. शिवाय निसर्गाचे समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावणे गरजेचे असल्याचे सांगितले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. एस. बी. पवार यांनी सूत्रसंचालन कले. एम. डी. खोत यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

नागपंचमी यात्रेनिमित्त भाविकांची दर्शनासाठी निपाणी नागोबा मंदिरात दिवसभर गर्दी

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरात सोमवारी (ता.१७) नागपंचमी सण साजरा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *