Thursday , August 27 2026
Breaking News

उन्हामुळे शहरातील मैदाने पडली ओस घरातील बैठ्या खेळांकडे मुलांचा कल

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यात सध्या उन्हाचा पारा ४१ अंशांच्या पार गेल्याने शहर व ग्रामीण भाग अक्षरशः होरपळून निघत आहे. या तीव्र उष्णतेचा फटका विद्यार्थ्यांना आणि सुट्यांचा आनंद घेणाऱ्या तरुणाईला बसला आहे. शहरासह ग्रामीण भागातील खेळांची मैदाने वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्या वेळी ओस पडत असून घरीच बैठ्या खेळांकडे चिमुकल्यांचा कल वाढला आहे.
एप्रिल महिन्याच्या मध्यापासूनच सूर्याने आग ओकायला सुरवात केल्याने सकाळी दहापासूनच उन्हाचे चटके जागवू लागले आहेत. सायंकाळी सहा पर्यंत गरम झळा वाहत असल्याने मैदाने खेळाडूंअभावी ओस पडली आहेत.
सकाळी आणि सायंकाळी क्रिकेट, व्हॉलीबॉल आणि धावपटूंनी गजबजल्या जाणा-यारी मैदानावर आता दुपारच्या वेळी शांतता पसरलेली आहे.वाढत्या तापमानामुळे डिहायड्रेशन आणि उष्माघाताचा धोका वाढला आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना आणि विशेषतः मुलांना दुपारच्या वेळी (दुपारी १२ ते ४) कडक उन्हात शारीरिक श्रम टाळण्याचे आवाहन केले आहे. जास्त प्रमाणात पाणी पिणे आणि सुती कपड्यांचा वापर करणे आरोग्यासाठी हितावह असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
—-

About Belgaum Varta

Check Also

निपाणीतील चिमगांवकर गल्लीतील विठ्ठल मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील चिमगांवकर गल्ली,बागवान गल्ली येथील विठ्ठल मंदिरात आयोजित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *