Wednesday , August 19 2026
Breaking News

‘रवळनाथ’ हौसिंग फायनान्सच्या सेवकांना सुधारित वेतन लागू : संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांची माहिती

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : गडहिंग्लज येथील रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीच्या कायम सेवेत असणाऱ्या सेवकांना सध्या ६ व्या आयोगानुसार वेतन दिले जात आहे. १ जून २०२६ पासून ग्रेड पे मध्ये वाढ करुन त्यांना सुधारित वेतन रचना लागू केल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष व संचालक एम. एल. चौगुले, अध्यक्ष प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर यांनी दिले.
सुधारित वेतन श्रेणीनुसार शिपाई वर्गाला कमीत कमी ७०० ते जास्तीत जास्त २२०० रुपयापर्यंत वाढ, क्लार्क कम कॅशिअर यांना ९०० ते २७०० कृपयापर्यंत वाढ, लेखापालांना ३००० ते १०५०० रुपया पर्यंत वाढ, शाखा अधिकाऱ्यांना ३५०० ते १०६०० रुपया पर्यंत वाढ आणि प्रधान कार्यालयाकडील अधिकारी व आय. टी. विभाग सेवकांना ४३०० ते ११४०० पर्यंत वेतन वाढ झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शिपाई यांना कमीतकमी १६१६८, क्लार्क कम कॅशिअर यांना २४२४२, लेखापालांना ३५५७२, शाखा अधिकाऱ्यांना ३९९३४ रुपये तर निमशहरी भागातील शिपाई १६४६० रुपये, क्लार्कना २४६६५ रुपये लेखापापावलांना ३५१४० रुपये शाखा अधिकाऱ्यांना ४३०५५ शहरी भागातील शिपायांना १८७५२ रुपये, क्लार्कना २७५७८, लेखापाल ४०२०, शाखाधिकारी र ४७६७६, पुणे शाखेमधील शिपाई यांना रु. २१६२८, क्लार्क रु. ३२३५७, लेखापाल रु. ४५९१२, शाखाधिकारी ५२५३९, व प्रधान कार्यालयामधील विविधपदावर कार्यरत असणा-या अधिका-यांना वेतन वाढ झाली आहे.
१ एप्रिल २०२७ पासून महाराष्ट्र शासनाचा ७ वा वेतन आयोग लागू करण्याचा विचार असून कमीतकमी १०००० ते रु. ३०००० पर्यंत वेतन वाढ होण्याची शक्यता असल्याचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी सांगीतले.
संस्था स्थापने पासूनच राजकारण विरहीत असल्यामुळे संस्थेला जो काही नफा होईल तो नफा सभासदांना कमीतकमी ९% लाभांश वाटून शिल्लक नफा कर्मचारी यांच्या वेतनावरच संचालक मंडळ खर्च करीत असल्याचे चेअरमन प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर यांनी सांगतले.

About Belgaum Varta

Check Also

पहिल्या श्रावण सोमवारी शिवालये गजबजली

Spread the love  दर्शनासाठी दिवसभर गर्दी : विविध ठिकाणी शाबू खिचडीचे वाटप निपाणी (वार्ता) : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *