Wednesday , August 19 2026
Breaking News

नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशनतर्फे तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी शहर व तालुक्यातील नागरिकांच्या विविध प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी ४ जे. आर ऑर्गनायझेशने आक्रमक भूमिका घेतली आहे. संस्थेने तहसीलदार सुरेश मुंजे, नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांना लेखी निवेदन दिले. निवेदनातील माहिती अशी, अनेक दिवसांपासून विविध मागण्यांचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. परंतु केवळ आश्वासनाशिवाय प्रत्यक्ष कार्यवाही झाली नाही. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. त्यामुळे संस्थेने केलेल्या मागण्यांवर ठोस कार्यवाही न झाल्यास निपाणी तहसीलदार कार्यालयासमोर अनिश्चितकालीन उपोषण सत्याग्रह सुरू करण्याचा इशारा दिला आहे. यासाठी परवानगीचे पत्रही दिले आहे.
निपाणीतील सर्व सरकारी कार्यालयात कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी व ये-जा नोंदणी सक्तीची करावी. शहर गांजा मुक्त करावे. बेकायदेशीर दत्त, खुले, नाट्यगृहामुळे नागरिकांना होणारा त्रास थांबवून जबाबदारांवर कारवाई करावी. महात्मा गांधी सरकारी रुग्णालयात तज्ञ डॉक्टर नेमून त्याला तालुका स्तरावर दर्जा द्यावा. खासगी शाळांच्या अनावश्यक शुल्कवरकारवाई करावी. जवाहर तलावाची समस्या सोडवून त्याचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करावा. छत्रपती संभाजी महाराज चौकातील सिग्नलची आवश्यकता तपासावी. माजी नगराध्यक्ष विश्वासराव शिंदे नगर, बालाजी नगर व हुडको कॉलनीच्या नागरी समस्या सोडवाव्यात. नगरपालिकेची जमीन उद्यान व जिमसाठी राखीव ठेवावी. देवचंद कॉलेज रोड लगतच्या सर्वे नंबर 190B व 181A मध्ये नागरिकांच्या सोयी सुविधा द्याव्यात. असेही निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनाची प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, डीजीपी कर्नाटक आदींना माहितीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. निवेदनावर
सचिन पोवार, ज्ञानेश्वर चव्हाण, अविनाश माने, संतोष मावरकर, विशाल कांबळे, योगेश कांबळे, युवराज शेटके, योगेश पोतदार, ए. आय. हलगले, मोहन पाटील, अशोक खांडेकर यांच्या सह्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

पहिल्या श्रावण सोमवारी शिवालये गजबजली

Spread the love  दर्शनासाठी दिवसभर गर्दी : विविध ठिकाणी शाबू खिचडीचे वाटप निपाणी (वार्ता) : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *