Monday , June 15 2026
Breaking News

बोरगाव सर्कल रुंदीकरण कामात दुजाभाव

Spread the love

 

अधिकारी, लोकप्रतिनिधीसह स्थानिक नेत्यांनी लक्ष देण्याची मागणी

निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील सर्कल परिसरातील वाहतुकीची कोंडी कमी होऊन सुरळीत वाहतूक होण्याच्या उद्देशाने शासनाकडून २ कोटी ५० लाखांच्या निधीतून रस्ता रुंदीकरण कामास सुरुवात करण्यात आले. पण सध्या सर्कल रुंदीकरण काम पाहिल्यास एकीकडे जास्त व एकीकडे कमी रुंदीकरण झाल्याचा आरोप शहरातील नागरिक व व्यापारी वर्गातून केले जात असल्याने या रुंदीकरण बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे.या समस्येडे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, शहरातील नेते मंडळी लक्ष देणार का असा सवाल नागरिकांमधून केला जात आहे.
बोरगाव सर्कल रुंदीकरणासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीवरून काँग्रेस व भाजपमध्ये श्रेयवाद रंगले. या वादातून २४ जानेवारी २०२६ रोजी खासदार आमदार व स्थानिक नेते मंडळींच्या उपस्थितीत कामास सुरुवात करण्यात आले. सर्वांनी एकत्र येऊन कामाचा उद्घाटन केल्याने लवकरच काम पूर्ण होणार व कोणावरही अन्याय होणार नसल्याचे सांगितले होते. मात्र सध्याची स्थिती पाहता सर्कलचे रुंदीकरण कासवगतीने सुरु आहे. याशिवाय दूजाभाव का असा संतप्त सवाल नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे. कोणावरही अन्याय न करता योग्य पद्धतीने काम करण्याची मागणी केली जात आहे.
उपलब्ध निधीतून सर्कलच्या रुंदीकरणासह डांबरीकरण होऊन रस्त्याच्या मध्यभागी हायमास्ट दिवे, कीर्तीस्तंभाचे सुशोभीकरण, सर्कल परिसरात ३.५ फूट फुटपाथसह अन्य कामासाठी हा निधी मंजूर झाले आहे. रुंदीकरणामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असल्याने अतिक्रमण व स्व मालकीच्या जागेत असलेल्या काही व्यापाऱ्यांनी तातडीने आपले दुकाने हटविले. सर्कलच्या मध्य भागातून मोजमाप करून समानतेने सर्कल रुंदीकरण करणे गरजेचे होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. पावसाळ्यापूर्वी या सर्कलचे डांबरीकरण व सुशोभीकरण होणे गरजेचे होते. पण काम संथ गतीने काम सुरू असल्याने शहरासह प्रवासी वर्गालाही त्रास होत आहे. याशिवाय वाहनांच्या वर्गणीमुळे मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य पसरत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

भूमी वात्सल्य फाऊंडेशनतर्फे यरनाळमध्ये शैक्षणिक साहित्य वाटपासह वृक्षारोपण

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी जवळील यरनाळ येथील भागवत धर्माचे प्रचारक व प्रसारक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *