Wednesday , August 19 2026
Breaking News

ममदापुरच्या कन्येची वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी भरारी

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : ममदापुर (के. एल.) येथील शिक्षक शंकर गणपती इंगळे यांच्या नात प्रगती संजय इंगळे हिने एम.बी.बी.एस. परीक्षेत विशेष प्राविण्यासह यश संपादन केले आहे. या उल्लेखनी यशामुळे ममदापूर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यानिमित्त तिचा बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहातर्फे उत्तम पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याशिवाय पुढील शैक्षणिक व सेवाभावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी महारुद्र स्वामी, माजी ग्रामपंचायत सदस्य निरंजन पाटील (सरकार), माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष गजानन कावडकर, प्रकाश पाटील, प्रकाश सदाशिव पाटील, रावसाहेब गोरवाडे, संतोष पाटील, संतोष गोरवाडे, उत्तम दादू पाटील, महादेव मधाळे यांच्यासह इंगळे परिवारातील सदस्य, मित्र परिवार, मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पहिल्या श्रावण सोमवारी शिवालये गजबजली

Spread the love  दर्शनासाठी दिवसभर गर्दी : विविध ठिकाणी शाबू खिचडीचे वाटप निपाणी (वार्ता) : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *