Wednesday , August 19 2026
Breaking News

भूमी वात्सल्य फाऊंडेशनतर्फे यरनाळमध्ये शैक्षणिक साहित्य वाटपासह वृक्षारोपण

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी जवळील यरनाळ येथील भागवत धर्माचे प्रचारक व प्रसारक निवृत्ती घाटगे यांचा जन्मदिनानिमित्त ‌निपाणी येथील भूमी वात्सल्य फाऊंडेशनतर्फे पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले परिवारातर्फे स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
यावेळी पिंपळ, पिंपरी व महोगणी या विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच उपस्थितांना लहान रोपे भेट देऊन वृक्षसंवर्धनाची प्रेरणा देण्यात आली. वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी व पर्यावरणपूरक उपक्रम राबविल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमात सुरेश घाटगे यांच्या हस्ते निवृत्ती घाटगे यांचा शाल देऊन सन्मान करण्यात आला. याशिवाय ‘करू पर्यावरण संरक्षण’ विषयक पुस्तके भेट देण्यात आली.
पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी, निवृत्ती घाटगे यांच्या आध्यात्मिक, सामाजिक व धर्मप्रसाराच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. समाजात नैतिक मूल्ये रुजविण्यासाठी आणि भागवत धर्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी आहे . वृक्षारोपणासारख्या उपक्रमातून वाढदिवस साजरा करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास राजेंद्र घाटगे, शिवाजी घाटगे, समरसिंह पाटील, दिनकर लाटकर, पांडुरंग पोवार, प्रदीप पोवार, सुभाष डावरे, महादेव खामकर, अथर्व घाटगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पहिल्या श्रावण सोमवारी शिवालये गजबजली

Spread the love  दर्शनासाठी दिवसभर गर्दी : विविध ठिकाणी शाबू खिचडीचे वाटप निपाणी (वार्ता) : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *