सीमा प्रश्नाच्या लढ्यासाठी गाव पुन्हा संघटित; आगामी मोर्चे व आंदोलनात मोठ्या सहभागाचा निर्धार
येळ्ळूर : सीमाप्रश्नाच्या लढ्याला अधिक बळकटी देण्यासाठी येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आली असून अध्यक्षपदी वामन पाटील, कार्याध्यक्षपदी दुद्दाप्पा बागेवाडी आणि सेक्रेटरीपदी प्रकाश अष्टेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. रविवारी (दि. १४) यरमाळेजवळील ‘जाधव फार्महाऊस’वर आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण गावाच्यावतीने नव्या कार्यकारिणीला एकमुखी पाठिंबा देण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी वामन पाटील होते.
प्रारंभी प्रकाश अष्टेकर यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये येळ्ळूरमधून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर होणाऱ्या आंदोलनातही सक्रिय सहभाग नोंदविण्याबाबत चर्चा करण्यात आली.
सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी येळ्ळूर गावाने नेहमीच आघाडीची भूमिका बजावली आहे. यापुढेही गाव संघटित ठेवून समितीच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यक्रम राबविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
समितीच्या पुनर्रचनेसाठी १६ सदस्यीय समिती गठित करण्यात आली होती. या समितीने नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. अध्यक्षपदी वामन पाटील, कार्याध्यक्षपदी दुद्दाप्पा बागेवाडी, उपाध्यक्षपदी राजू पावले व प्रदीप देसाई, सेक्रेटरी म्हणून प्रकाश अष्टेकर, उपसेक्रटरी म्हणून बी.एन. मजुकर व उदय जाधव, तर खजिनदारपदी सतीश शिवाजी पाटील यांची निवड करण्यात आली. उपखजिनदार म्हणून नागेंद्र पाखरे , डॉ. विवेक मेणसे यांची नियुक्ती करण्यात आली. हिशोब तपासणीस म्हणून अनिल हुंदरे, सतिश मल्हारी देसूरकर व प्रा. सी. एम. गोरल यांची निवड करण्यात आली.
याशिवाय जनसंपर्क प्रमुख म्हणून सूरज गोरल, दयानंद उघाडे, नागेश बोबाटे, यल्लुप्पा पाटील, सतीश कुगजी, श्रीकांत नांदुरकर, धाकलू करविनकोप, गणेश अष्टेकर, रमेश मो. धामणेकर, प्रकाश पाटील, आनंत गावडू पाटील, आनंत मा. तुळजाई, राकेश परीट, प्रकाश मालुचे, रमेश पाटील, रमेश ज. धामणेकर, अनिल पाटील, भीमराव पुण्याणावर, कृष्णा शहापूरकर, शिवाजी बा. पाटील, पांडुरंग पाटील,
आदींसह २१ सदस्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
बैठकीच्या प्रारंभी समितीचे दिवंगत नेते व कार्यकर्ते कै. अर्जुन गोरल, कै. यल्लापा मोनापा गोरल, कै. कुम्माणा गोरल, कै. मोनाका महादेव गोरल, कै. यल्लापा दुद्दापा कुगजी, कै. शिवाजी अमृत पाटील, कै. के. एल. हुंदरे व कै. बी. बी. पाटील यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
बैठकीत उदय जाधव, अनिल हुंदरे व डी. जी. पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. शेवटी दत्ता उघाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या बैठकीला दौलत कुगजी, चांगदेव परीट, शिवाजी पाटील, महेश जुवेकर, शिवाजी कदम, शिवाजी सायनेकर, सी. बी. पाटील, विठ्ठल कुरंगी, मारूती तुळजाई, गोविंद काळसेकर, कृष्णा बिजगरकर, प्रशांत पाटील, रामा पाखरे, सतीश धामणेकर, अजित गोरल, नेताजी गोरल, दीपक कर्लेकर, रमेश घाडी, बाळासाहेब पावले, परशराम बिजगरकर, दर्शन पाटील, सुवर्णा बिजगरकर, रूपा पुण्याणावर, अनुसया परीट, वनिता परीट यांच्यासह नवहिंद संघटना, नेताजी संघटना, समाज सारथी सेवा संघ, कृषी पतीन बँक, शेतकरी संघटना, ब्रम्हलिंग सोसायटी, स्वामी विवेकानंद सोसायटी, महाराष्ट्र कुस्ती मैदान, हिंदवी स्वराज्य संघटना, जयभिम संघटना आदि संघटनांचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.
दरम्यान, अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर वामन पाटील यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. नव्या कार्यकारिणीमुळे येळ्ळूरमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चळवळीला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
Belgaum Varta Belgaum Varta