Tuesday , August 18 2026
Breaking News

निपाणी मराठा मंडळमध्ये नागपंचमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मराठा मंडळ संचलित बालवाडी, मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा व निपाणी मराठा मंडळ हायस्कूल, निपाणी यांच्या संयुक्त विद्यमाने नागपंचमीचा सण पश साजरा करण्यात आला. नागपंचमीच्या निमित्ताने शाळेच्या परिसरात नागदेवतेचे पूजन करण्यात आले. यावेळी पालक सुबोध कुलकर्णी, रोहित कदम मनीषा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत नागदेवतेच्या प्रतिमेचे पूजन झाले.

विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीतील सण-उत्सवांचे महत्त्व समजावे, पारंपरिक मूल्यांची जपणूक व्हावी आणि आपल्या समृद्ध संस्कृतीशी त्यांची नाळ जोडली जावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्याध्यापक माननीय प्रा. ॲड. डी. डी. हळवणकर यांनी, सण-उत्सव हे धार्मिक विधी नसून ते संस्कृती, परंपरा आणि संस्कारांचे जिवंत प्रतीक आहेत. आधुनिक व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे आणि तिचे जतन करण्याची जाणीव निर्माण करणे ही शिक्षण संस्थेचीही जबाबदारी असल्याचे सांगितले.
नागपंचमीच्या निमित्ताने पारंपरिक वेशभूषा, धार्मिक संस्कार, सामूहिक सहभाग आणि आनंदी वातावरणामुळे शाळेचा परिसर उत्सवी रंगात न्हाऊन निघाला.
कार्यक्रमास प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बाळासाहेब मोहिते, कार्यकारी अधिकारी अमोल पाटील, व्ही. व्ही. पत्की, एस. डी. साखळकर, जे. आर. खपले, ए. एम. यादव, के. एल. कांबळे, के. एस. देसाई, अर्चना पाटील, पूजा पाटील, प्रियांका पाटील, धनश्री पाटील, एस. बी. चौगुले, एस. एस. पाटील, जी. एस. पाटील, पी. एस. घाटगे, एस. बी. कांबळे, व्ही. एस. बुरुड, जे. पी. ढंगे, एस. एस. मोरे, एम. ए. चव्हाण, अश्लेषा केसरकर यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

समाज हिताच्या प्रश्नासाठी समाज सारथी संघ राहणार अग्रेसर

Spread the love  मृत्यू नोंदणीतील अडथळे, शिवाजी रोडवरील विद्युत तारा दुरुस्ती, येळ्ळूर रस्त्यावरील कचऱ्याच्या समस्येबाबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *