Tuesday , August 18 2026
Breaking News

गुड्स शेड रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकाच्या दक्षिण प्रवेशद्वाराला जोडणाऱ्या प्रमुख गुड्स शेड रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून, या रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसह दोन्ही बाजूंना गटार व्यवस्था उभारण्यात यावी, अशी मागणी खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे करण्यात आली आहे.

शहापूर तसेच दक्षिण बेळगाव परिसरातील हजारो नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांसाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. मात्र, रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. एल अँड टीच्या कामामुळे तसेच पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.

रेल्वे स्थानक, डेक्कन हॉस्पिटल आणि बसवेश्वर रेल्वे उड्डाणपुलाच्या परिसराला जोडणाऱ्या या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रुग्णवाहिका, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

यापूर्वी महापालिका आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत निवेदने देण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून उपविभागीय अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या होत्या. मात्र, अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. दरवर्षी केवळ तात्पुरती डागडुजी केली जात असल्याने समस्या कायम आहे.

आगामी गणेश विसर्जनाच्या काळात रामतीर्थ तलावाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे खासदार जगदीश शेट्टर यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून रस्त्याचे कायमस्वरूपी डांबरीकरण तसेच दोन्ही बाजूंना गटार बांधण्याबाबत संबंधित विभागांना निर्देश द्यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

समाज हिताच्या प्रश्नासाठी समाज सारथी संघ राहणार अग्रेसर

Spread the love  मृत्यू नोंदणीतील अडथळे, शिवाजी रोडवरील विद्युत तारा दुरुस्ती, येळ्ळूर रस्त्यावरील कचऱ्याच्या समस्येबाबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *