Tuesday , August 18 2026
Breaking News

पार्वतीनगर, शाहूनगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीती

Spread the love

 

बेळगाव : कंग्राळी खुर्द येथील पार्वतीनगर व शाहूनगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, वयोवृद्ध नागरिक, लहान मुले तसेच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांवर कुत्र्यांकडून अचानक हल्ले केले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

परिसरातील रस्त्यांवर मोठ्या संख्येने भटक्या कुत्र्यांचा वावर असून, दुचाकीस्वार तसेच पायी जाणाऱ्या नागरिकांच्या मागे धावण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

या समस्येकडे संबंधित महानगरपालिका प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावमध्ये तालुक्यातील विविध शाळांमध्ये युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप

Spread the love  बेळगाव : मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच मराठी शाळेतील पटसंख्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *