

बेळगाव : भक्तांच्या नवसाला पावणारा व सर्व भक्तांची मनोकामना पूर्ण करणारा असे नाव लौकिक प्राप्त झालेल्या श्री महालक्ष्मी व श्री सरस्वती सहित असणारे द्विभुज स्वयंभू श्री वरद सिद्धी विनायक मंदिर, (मार्कंडेयनगर ए.पी.एम.सी समोर) येथे नवग्रह मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना मंगळवार दि. 25/8/2026 रोजी करण्यात येणार आहे. तत्पूर्वी मंदिरात दिनांक 20/8/26 पासून धार्मिक विधी सुरू होतील. प्राणप्रतिष्ठापना निमित्त आणि लोक कल्याणार्थ मंदिरचे ट्रस्टि मल्लिकार्जुन सत्तीगेरी यांनी 12/07/26 पासून 45 दिवसांच्या उपवास व्रत सुरू केला आहे. अखेरचे अकरा दिवस निरंकार उपवास व्रत करत आहेत त्याचीही सांगता 25 ऑगस्ट रोजी होईल. भाविकांनी मंदिराला उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta