Tuesday , August 18 2026
Breaking News

नागपंचमीनिमित्त मुचंडी मळ्यात श्री नागदेवता मंदिरात धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद

Spread the love

 

बेळगाव : महात्मा फुले रोड, मुचंडी मळा येथील श्री नागदेवता मंदिरात नागपंचमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपंचमी भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात येणार आहे.

यानिमित्त २९ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता लघुरुद्राभिषेक, तर सकाळी ९ वाजता सुदर्शन होम आयोजित करण्यात आला आहे. तसेच सांप्रदायिक भजनाचा कार्यक्रमही होणार आहे.

धार्मिक कार्यक्रमांनंतर दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री नागदेवतेचे दर्शन घ्यावे, धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

स्थळ : श्री नागदेवता मंदिर, महात्मा फुले रोड, कोपर पेपर रेस्टॉरंटच्या मागे, मुचंडी मळा, बेळगाव.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावमध्ये तालुक्यातील विविध शाळांमध्ये युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप

Spread the love  बेळगाव : मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच मराठी शाळेतील पटसंख्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *