Monday , June 15 2026
Breaking News

युवा समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; मराठी शिक्षण, नेतृत्व व स्पर्धा परीक्षांचे महत्त्व अधोरेखित

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने २०२५-२६ शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीमध्ये बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण आणि खानापूर गटशिक्षण विभागात पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवून यश संपादन केलेल्या विद्यार्थांचा सत्कार सोहळा संपन्न. हा सोहळा रविवार १४ जून रोजी श्री तुकाराम महाराज संस्कृतिक भवन बेळगाव येथे आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, प्रमुख वक्त्या आणि मार्गदर्शक प्रा. ॲड. सरिता सतीश पाटील, मध्यवर्तीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे आणि सीमाप्रश्नी धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरूवात झाली. सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचे कौतुक करणे गरजेचे असून, मागील पाच वर्षे हा कौतुक सोहळा आयोजित केला जात आहे, यावर्षी राज्य मराठी विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा संपन्न होत असून त्यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी श्री. प्रकाश मरगाळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा युवा समितीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच प्रा. सरिता पाटील यांचे स्वागत आणि सत्कार माजी नगरसेविका सुधा भातकांडे आणि शिवानी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रा. ॲड. सरिता सतीश पाटील यांनी दहावीनंतरचे ध्येय, दिशा आणि आव्हाने याविषयावर मार्गदर्शन केले यावेळी त्या म्हणाल्या
विद्यार्थ्यांनी स्वतःच्या भाषेवर प्रभुत्व मिळविले की जगातील कोणतीच भाषा अवगत करणे कठीण नाही. स्वतःची ओळख आधी स्वतः करून घेणे गरजेचे आहे, लोक काय म्हणत आहेत, ओढा कोणत्या दिशेला आहे ह्यापेक्षा आपण कोणत्या क्षेत्रात प्रभावीपणे शिक्षण घेऊन काम करू शकतो हे महत्त्वाचे.
तसेच घेतलेल्या शिक्षणाचा केवळ स्वतः आणि आपल्या कुटुंबापुरता उपयोग न करता त्याचा आपल्या समाजाची प्रगती कशी साधता येईल हे सुद्धा पाहणे तितकेच महत्वाचे आहे. दहावी नंतरचे शिक्षण घेताना स्पर्धा परीक्षांचा सुद्धा अभ्यास करणे सध्या गरजेचे आहे, कारण उत्तर भारतीय लोक मोठ्या सरकारी हुद्द्यावर दिसून येतात आणि आपला भाग त्यात मागे पडताना दिसतो
विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे ओझे न घेता शैक्षणिक प्रवासाच्या प्रत्येक टप्यात आनंद घ्यावा. आपण ध्येय ठरवताना केवळ एकच पर्याय न ठेवता अनेक पर्याय सुद्धा उपलब्ध ठेवणे गरजेचे आहे.
आताच्या घडीला पालक समाजातील कित्येक घटकांपासून आपल्या पाल्याला दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करतात, केवळ शिक्षण स्वतःच्या प्रगतीसाठी अंतिम आहे हेच मनात बिंबवतात त्यामुळे येणारी पिढी ही नेतृत्व गुण नसलेली किंवा नेतृत्वच नसलेली घडेल का अशी भीती व्यक्त केली.
युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी युवा समिती सीमाप्रश्न सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध असून त्याचबरोबर मराठी भाषा, शाळा आणि विद्यार्थी यांच्यासाठी नेहमी कार्यरत असेल असे सांगितले. आणि युवा समितीच्या कार्याचा आढावा घेतला.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.
सत्कार करण्यात आलेले गुणवंत विद्यार्थी खालील प्रमाणे
खानापूर तालुक्यातील विद्यार्थी
प्रथम क्रमांक : जान्हवी शामराव पाटील (राज्यात मराठी माध्यमात प्रथम)
दुसरा क्रमांक : निकिता लक्ष्मण चौरी
तिसरा क्रमांक : सोनाली तुकाराम दळवी

बेळगाव ग्रामीण विभागातील विद्यार्थी
प्रथम क्रमांक : प्राजक्ता उत्तम चौगुले
द्वितीय क्रमांक : पल्लवी सुरज पाटील
तृतीय क्रमांक : समीक्षा लक्ष्मण कोवाडकर

बेळगाव शहर विभागातील विद्यार्थी
प्रथम क्रमांक : सोहम सतीश हळदणकर
द्वितीय क्रमांक : स्नेहा यल्लाप्पा हिरोजी
तृतीय क्रमांक : अनिकेत बाळकृष्ण जाधव
सत्काराचे स्वरूप शाल, स्मृतिचिन्ह, पुस्तके, रोख रक्कम असे होते.
उपस्थित मान्यवर समिती नेते रणजीत चव्हाण पाटील, आबासाहेब दळवी, आर. एम. चौगुले, निरंजन सरदेसाई, मदन बामणे, ॲड.सुधीर चव्हाण, सुनील बाळेकुंद्री, सुधा भातकांडे, शिवानी पाटील, उमेश पाटील, श्रीधन मळीक, विश्वजित हसबे, अमित देसाई, महेश चौगुले, गुणवंत पाटील, सुनील मुरकुटे, भाऊ किल्लेकर, सोमशेखर सुतार, प्रदीप दळवी, शिवराज पाटील, प्रा. राहुल जाधव, प्रा.अशोक अलगोंडि, सागर मरगानाचे, सागर पाटील, प्रशांत भातकांडे, प्राजक्ता केसरकर, तनुजा कावळे, वृषाली पाटील, सचिन केळवेकर, वासू सामजी, राजू कदम, विनायक कावळे, सुरज कुडूचकर, संतोष कृष्णाचे, किरण हुद्दार, शेखर तळवार, महांतेश अलगोंडि, रोहन कुंडेकर, निखिल देसाई, सुरज चव्हाण, आशिष कोचेरी, साईराज जाधव, प्रवीण रेडेकर, अश्वजीत चौधरी, आकाश भेकणे, विकास भेकणे, महेश चौगुले, प्रवीण धामणेकर, सौरभ तोंडले, ओमकार नारळकर, श्री पाटील, शुभम कांबळे, हेमंत गुरव आदी उपस्थित होते।
सूत्रसंचालन प्रतीक पाटील यांनी केले तर आभार साईनाथ शिरोडकर यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

भारत विकास परिषदेच्या बेळगाव अध्यक्षपदी विनायक मोरे यांची तिसऱ्यांदा फेरनिवड

Spread the love  बेळगाव : भारत विकास परिषदेच्या बेळगाव शाखा अध्यक्षपदी विनायक मोरे यांची सर्वानुमते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *