Wednesday , August 19 2026
Breaking News

२८ ते ३१ जानेवारी दरम्यान पुण्यात रंगणार शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

Spread the love

 

पुणे : मराठी साहित्यविश्वासाठी अभिमानाची आणि ऐतिहासिक ठरणारी घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने केली आहे. मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा शतकपूर्ती सोहळा ठरणारे १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत पुण्यात भरणार असून, त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसराची निवड करण्यात आली आहे.

पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेत रविवारी झालेल्या महामंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी याची अधिकृत घोषणा केली.

शंभराव्या साहित्य संमेलनाचे औचित्य साधत हे संमेलन भव्य, ऐतिहासिक आणि संस्मरणीय स्वरूपात आयोजित करण्याचा महामंडळाचा मानस आहे. यासाठी स्थळ निवड समितीने एस. पी. महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसराची पाहणी करून विविध सुविधांचा सखोल आढावा घेतला होता.

संमेलनासाठी आवश्यक असलेले विस्तीर्ण प्रांगण, वाहनतळ, निवास व्यवस्था, वाहतूक सुलभता आणि इतर पायाभूत सुविधा लक्षात घेऊन विद्यापीठ परिसराची अंतिम निवड करण्यात आली. विद्यापीठ प्रशासन आणि कर्मचाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभणार असल्याने आयोजन अधिक सुकर होणार असल्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

या ऐतिहासिक संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड झाली असून, महाराष्ट्रासह देश-विदेशातील साहित्यप्रेमी, लेखक, कवी, संशोधक आणि वाचकांचा मोठा सहभाग अपेक्षित आहे.

मराठी साहित्याच्या शतकपूर्तीचा साक्षीदार ठरणारा हा चार दिवसांचा साहित्य महोत्सव सांस्कृतिक, वैचारिक आणि साहित्यिक पर्वणी ठरणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

अमरावतीत आंबोली पब्लिक स्कूलच्या एनसीसी कॅडेट्सची सुवर्ण कामगिरी; राष्ट्रीय थल सैनिक शिबिरासाठी निवड

Spread the love  रायफल शूटिंगमध्ये सार्जंट श्रीपाद तार्लेकर यांना सुवर्णपदक; CQMS राज बागवे यांचीही राष्ट्रीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *