

तुमकूर : माजी शिक्षणमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी. सी. नागेश (६७) यांचे मंगळवारी बंगळुरू येथील त्यांच्या मुलीच्या निवासस्थानी आजारपणामुळे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
बी. सी. नागेश हे व्यवसायाने बी.ई. इंजिनिअर होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा दीर्घकाळ संबंध होता. तिपटूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर त्यांनी निवडणूक लढवून दोन वेळा आमदार म्हणून काम केले.
राज्याचे शिक्षणमंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांनी शिक्षण क्षेत्रात विविध सुधारणा राबविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने भाजपसह शिक्षण आणि राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
त्यांच्यावर तिपटूर येथील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार व इतर अंत्यविधी पार पडणार आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta