Sunday , August 16 2026
Breaking News

जवाहर तलाव परिसरातील मोकळी जागा महिला, बाल विकास विभागाला न देण्यासाठी पालिकेला निवेदन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील जवाहर तलाव हे निपाणीच्या नागरिकासाठी निर्मिती केली आहे. या तलावाद्वारे अनेक वर्षांपासून निपाणीच्या नागरिकांची तहान भागवत आहे. नागरिकांना चांगले पाणी मिळावे यासाठी तलावा शेजारी एक मोकळी जागा आहे. भविष्यात या जागेचा वापर केवळ तलावाच्या कामासाठीच केला जाऊ शकतो. शेजारी असलेली ही १ एकर २० गुंठे रिकामी जागा नागरिकासह लहान मुलांचे खेळाचे मैदान बांधण्याकरिता आहे. ही जागा महिला व बाल विकास विभागाला देण्यासाठी नगर पालिका प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. पण ही जागा महिला व बालविकास खात्याला देण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे सन्मानित विभागाला नगरपालिकेने दुसरीकडे जागा द्यावी, या मागणीसाठी नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांना बुधवारी (ता.१७) निवेदन देण्यात आले.
याबाबत ६ जून रोजी अंतर्गत नियम १९६६ अन्वये कागदी सूचना क्रमांक (१११) द्वारे देण्यात आले आहे. परंतु निपाणी शहरातील नागरिकांच्या मते ही तलावाजवळील जागा, महिला आणि बाल विकास विभागासाठी योग्य नाही. नागरिकांनी असा निष्कर्ष काढला आहे. या विभागासाठी योग्य नाही आणि नगरपालिकेने या विभागासाठी दुसरीकडे जमीन द्यावी. तलावाची जमीन जशी आहे तशीच राहील, निपाणीमध्ये पाण्यासाठी दुसरी कोणतीही जागा नाही. यामुळे महिला आणि मुलांनाही त्यांच्या विकासासाठी दुसरीकडे जागा मिळेल. या बाबींचा विचार करून तलावाजवळील मोकळ्या जमिनीचे वाटप थांबवावे असेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर ॲड. संजय चव्हाण माजी नगराध्यक्ष विजय शेटके, राजेंद्र चव्हाण, चंद्रकांत जासूद, विनायक वडे, अल्लाबक्ष बागवान, किरण कोकरे, प्रथमेश जासूद, किरण पाटोळे, रोहित यादव, धनाजी निर्मळे, फारुख पटेल, अस्लम शिकलगार, अशोक लाखे, शशिकांत चडचाळे यांच्यासह नागरिकांच्या सह्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी येथील काँग्रेस कार्यालयात स्वातंत्र्य दिन कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील माजी आमदार दिवंगत काकासाहेब पाटील यांच्या कार्यालयात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *