Wednesday , June 17 2026
Breaking News

बोरगाव येथील टेक्स्टाईल पार्कबाबत हुबळीचे हेस्कॉमचे अध्यक्ष अजमपीर खाद्री यांना राजेंद्र वड्डर- पवार यांचे निवेदन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील टेक्स्टाईल पार्क गेल्या पाच वर्षापासून बंद स्थितीत आहे. याबाबत अनेकवेळा येथील कारखानदारांनी कर्नाटक सरकार व संबंधित अधिकाऱ्यांना भेटून चर्चा केली. पण याला कोणत्याही प्रकारची यश आले नाही. कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्रीपदी डी. के. शिवकुमार त्यांनी सूत्रे हातात घेतली आहेत. त्यामुळे बोरगाव येथील टेक्स्टाईल पार्क सुरू होईल अशी, आशा व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर- पवार यांनी हुबळीचे हेस्कॉमचे अध्यक्ष अजमपीर खाद्री यांना याबाबतचे निवेदन देऊन बोरगाव टेक्स्टाईल पार्कबाबत चर्चा केली.
सध्या कर्नाटक सरकारकडून एचटीचे एलटीमध्ये रुपांतर करण्यात येत आहे. असे रुपांतर केल्यास ११ रुपये प्रति युनिटचे कमी होऊन ५ रुपये दर प्रति युनिट होणार आहे आणि असे झाल्यास बोरगाव टेक्स्टाईल पार्क पुन्हा जोमाने सुरू होणार आहे.
सांगितले. हुबळी हेस्कॉमचे एमडी ज्योती, वरिष्ठ अधिकारी पालनकर यांच्याशीही चर्चा केली.
बोरगाव येथे आमदार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून ११७ एकरमध्ये केएसआयबीसीसी यांच्यामार्फत टेक्स्टाईल पार्कची निर्मिती करण्यात आली. त्यामध्ये ७५ एकर हे टेक्स्टाईल पार्कसाठी राखीव ठेवल्यास उर्वरित जागेमध्ये रस्ते, गटारी व बागबगीच्या साठी राखीव ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी ३५ ते ४० कारखाने कार्यरत आहेत. त्यांना ९० टक्के सबसीडीच्या दरावर कर्नाटक सरकारकडून सवलत देण्यात आली आहे. सुमारे १०० कोटी पेक्षा जास्त रक्कम या बोरगाव येथील टेक्स्टाईल पार्कवर कर्नाटक सरकारने खर्च केले आहेत. त्यामुळे एचटीचे रुपांतर एलटीमध्ये केल्यास येथील टेक्सटाईल पार्क नव्याने सुरू होऊन येथे रोजगार निर्मिती होणार आहे.
या टेक्स्टाईल पार्कमध्ये कामाची व्यवस्था करण्यात येत होती. पण महाराष्ट्र सरकारकडून इचलकरंजी येथील टेक्स्टाईलधारकांना ५ रुपये प्रति युनिटप्रमाणे विद्युत आकारणी करण्यात येत होते. पण बोरगाव येथील टेक्स्टाईल पार्कमधील विद्युत आकारणी ११ रुपये झाल्यामुळे येथील व्यावसायिकांना ते न परवडणारे झाले आणि यातून सदर
निर्मिती करण्यात आली. त्यावेळी कर्नाटक सरकारच्या ९० टक्के सबसीडीवर या ठिकाणी ३५ ते ४० उद्योजकांकडून कारखान्यांची निर्मिती केली. पण पाच वर्षांपूर्वी कर्नाटक सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या विद्युत दरात वाढ करून ११ रुपये प्रति युनिट करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

अथणीत विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

Spread the love  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरात गुरुवारी एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *