Monday , August 17 2026
Breaking News

‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली शिक्षिकेची तब्बल 30 लाखांची ऑनलाइन फसवणूक

Spread the love

 

बेळगाव : ऑनलाईन काम करून सहज पैसे कमावण्याचे आमिष दाखवत शाहूनगर येथील एका शिक्षिकेची तब्बल ३० लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहर सीईएन पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

ऑनलाइन काम करून सहज पैसे कमावण्याचे आमिष दाखवत शाहूनगर येथील एका शिक्षिकेची तब्बल 30 लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहर सीईएन पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षिकेला 30 मे 2026 रोजी फेसबुकवर ‘मेगा मार्ट’ची जाहिरात दिसली. जाहिरातीवरील लिंकवर क्लिक करताच त्यांना टेलिग्रामद्वारे संपर्क साधण्यात आला. त्यानंतर अज्ञात भामट्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ची संधी असल्याचे सांगत गुगलवरील विविध हॉटेल्सना रिव्ह्यू देण्याचे काम दिले.

प्रत्येक रिव्ह्यूसाठी 50 रुपये मिळतील, असे सांगून सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी शिक्षिकेच्या खात्यात 1,300 रुपये जमा करण्यात आले. त्यानंतर 1 जूनपासून विशेष टास्क सुरू होणार असून सात टास्क पूर्ण केल्यास मोठा आर्थिक लाभ मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले.

या बनावट योजनेवर विश्वास ठेवून शिक्षिकेकडून 30 मे ते 4 जून या कालावधीत विविध टप्प्यांमध्ये यूपीआय आणि इतर माध्यमांतून तब्बल 30 लाख 624 रुपये जमा करून घेण्यात आले. मात्र, गुंतवलेली रक्कम किंवा आश्वासित नफा परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

यानंतर त्यांनी शहर सीईएन पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात सायबर भामट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या ऑनलाइन नोकरी, गुंतवणूक किंवा जलद नफा देण्याच्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *