Thursday , June 18 2026
Breaking News

बेळगावच्या वाहनधारकांना मोठा दिलासा! वाहतूक दंडावर ५० टक्के सवलत; २१ जून ते १० जुलैपर्यंत विशेष योजना

Spread the love

 

बेळगाव : वाहतूक नियमांच्या उल्लंघनामुळे थकीत ई-चलन असलेल्या वाहनधारकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. कर्नाटक सरकारने मे २०२६ पूर्वी नोंद झालेल्या सर्व प्रलंबित वाहतूक ई-चलन दंडावर ५० टक्के सवलत जाहीर केली असून ही विशेष योजना २१ जून २०२६ ते १० जुलै २०२६ या कालावधीत लागू राहणार आहे.

बेळगावचे पोलीस आयुक्त यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, वाहनधारकांनी या संधीचा लाभ घेत जुन्या प्रलंबित दंडाची केवळ निम्मी रक्कम भरून प्रकरणांचा निपटारा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या निर्णयामुळे हजारो वाहनचालकांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दंड भरण्यासाठी प्रशासनाने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिक आपल्या जवळच्या वाहतूक पोलीस ठाण्यात किंवा पोलीस आयुक्त कार्यालयातील स्वागत कक्षात जाऊन दंड भरू शकतात. तसेच कर्नाटक वन किंवा बेळगाव वन केंद्रांतर्गत येणाऱ्या अशोक नगर, दूरदर्शन नगर (टीव्ही सेंटर), रिसालदार गल्ली (जुनी कॉर्पोरेशन इमारत) आणि गोवावेस येथील केंद्रांवरही ही सुविधा उपलब्ध आहे.

याशिवाय रस्त्यावर ई-चलन मशीनसह कार्यरत असलेल्या एएसआय व त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांकडेही थकीत दंड भरून अधिकृत पावती प्राप्त करता येणार आहे.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना या २० दिवसांच्या विशेष सवलत योजनेचा लाभ घेऊन प्रलंबित दंडाची प्रकरणे निकाली काढण्याचे आवाहन केले असून, वेळेत दंड भरल्यास अतिरिक्त आर्थिक भार टाळता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

नाना चुडासमा जयंती साजरी रक्तदानातून

Spread the love  जायंट्स मेन आणि जायंट्स सखीच्या वतीने रक्तदान शिबिर यशस्वी बेळगाव : जायंट्स …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *