तेऊरवाडी (एस. के. पाटील ) : महाराष्ट्रामध्ये सतत येणारा वनहत्तीचा कळप चंदगड वनपरिक्षेत्रात दाखल झाला आहे. मान्सून पूर्व शेतीच्या मशागतीची तयारी शेतकर्यांच्याकडून करण्यात येत असतानाच हत्तींचा कळप चंदगड तालुक्यात दाखल झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
कालच जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. त्याबरोबरच वेळी आधिच महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सून पावसासोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात वनहत्तीच्या कळपाचे आगमन झाले आहे. गेल्या तीन महिन्यापासून कोकणात स्थिरावलेल्या वनहत्तीच्या कळपाचे यावर्षी नेहमीपेक्षा लवकरच चंदगड वनपरिक्षेत्रात आले आहेत. दरवर्षी साधारण ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये चंदगड तालुक्यात हत्तीच्या कळपाचे आगमन होते. परंतु यावर्षी हत्तीचा कळप जुन महिन्यातच दाखल झाला आहे असे चंदगड वनपरिक्षेत्रचे अधिकारी डी. जी. राक्षे यांनी सांगितले. या हत्तींच्या कळपामध्ये चार हत्ती असनू त्यामध्ये १ नर, १ मादी आणि २ पिले आहेत. मौजे (खा. गुडवळे) येथे वन कर्मचाऱ्यांना गस्तीवर जंगल फिरती करत असताना हत्तीच्या कळपाचे दर्शन झाले. वनविभाग चंदगडचे गस्ती पथक हत्तीच्या कळपाचे मार्गावर असनू ग्रामस्थांनी वन विभागास सहकार्य करावे. हत्तीचा कळप निदर्शनास आल्यास तात्काळ वन विभागास कळवावे असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे.
Check Also
चंदगड तालुका डिजिटल मीडियाची नवी कार्यकारिणी अध्यक्षपदी संपत पाटील तर उपाध्यक्षपदी राहुल पाटील
Spread the love चंदगड : ८६ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या महाराष्ट्रातील पत्रकारांची मातृसंस्था मराठी पत्रकार परिषद …