बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शास्त्रीनगर भागात गुजरात भवन येथे गौरी चाफ्याची रोपटी लावण्यात आली. शनिवारी दुपारी भर पावसात रोपटी लावताना एक वेगळाच आनंद मिळत होता. पण सोबतच सकाळी ज्येष्ठ समाजसेवक, पर्यावरण तज्ञ शिवाजी दादांच्या सोबत पर्यावरणाच्या समतोल राखण्यासाठी बोललेले शब्द आठवत होते. अन् त्यांना गावीच राहायला सांगून त्यांच्याशिवाय रोपं लावण्याचा आनंद लूटतोय याची हूरहूर लागून राहिली, असे माध्यमांशी बोलताना राहुल पाटील यांनी सांगितले..
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व गुजरात भवनचे ज्येष्ठ संचालक भुपेंद्र पटेल, विजय बद्रा, भाविन पटेल, गौरांग राणा, भावेश चुडासमा, दक्षेस राणा, अमित राच्छ, नितीन बद्रा, युवराज राऊळ, निकुंज पटेल व राहुल पाटील हे उपस्थित होते. हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम नवरात्र उत्सव मंडळ गुजरात भवनचे अध्यक्ष रमेश लद्दड यांच्या मार्गदर्शनानुसार झाला.
Belgaum Varta Belgaum Varta