बेळगाव : वटहुकूम आणून अंमलात आणलेले कृषी आणि कामगार कायदे मागे घ्यावेत यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा गांभीर्याने विचार करुन हे कायदे रद्द करावेत अशी मागणी करुन बेळगावमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
सोमवारी बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृषक विरोधी कायदे आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात घोषणाबाजी करुन शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला.
केंद्र आणि राज्य सरकारने वटहुकूम जारी करुन अंमलात आणलेले कायदे राज्य जनविरोधी आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारच्या काळात आणीबाणी घोषित करण्यात आली होती. भाजप सरकार आता तेच कायदे अंमलात आणत आहेत. शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेल्या पिकाला योग्य दर मिळत नाही. एपीएमसी कायद्याची अंमलबजावणी करीत नाही. एमपीएमसी कायद्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करुन कार्पोरेट कंपनांची मदत केली जात आहे.
आता दुसऱ्यांदा आपल्या हक्कांसाठी संघर्ष करावा लागला आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला प्रतिसाद दिलाच पाहिजे. दिल्लीत ७ महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
प्रकाश नाईक, चुनाप्पा पुजारी, जयश्री गुरांनावर , आणि शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते .