Monday , May 18 2026
Breaking News

खानापूरात वनखात्याच्या कर्मचारी वर्गाला मास्कचे वितरण

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील रेल्वे स्टेशन जवळील वन खात्याच्या कार्यालयात वनकर्मचारी वर्गाला कर्नाटक सरकार विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांच्या हस्ते मास्क, सॅनिटायझर व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना शंकरगौडा पाटील म्हणाले की, कोरोनाच्या महामारीमुळे जनतेला अनेक त्रास झाला. अनेकांना जीव गमवावा लागला. यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे सक्तीचे आहे. त्याचबरोबर सोशलडिस्टन व इतर नियामाचे पालन करणेही गरजेचे आहे. तसेच वनखात्याच्या कर्मचारी वर्गाने मास्क वापरून आपले कार्य पार पाडावे, असे सांगितले.
यावेळी तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, बाबूराव देसाई, धनश्री सरदेसाई, संचालक कर्नाटक राज्य वन निगम बेंगलोर सुरेश देसाई, राजेद्र रायका, कार्यदर्शि गुंडू तोपिनकट्टी, तहसीलदार रेश्मा तालिकोटी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

हलशी सरकारी रुग्णालयातील डॉक्टरकडून रुग्णाला उद्धट वागणूक; रेशन कार्ड नसल्याने नाकारले उपचार

Spread the love  खानापूर : सरकारी रुग्णालय हे गरिबांसाठी मंदिर असायला हवे, पण हलसीमध्ये रुग्णाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *