खानापूर (प्रतिनिधी) : तालुक्याच्या विविध भागात २० हजार झाडे लावून नवा इतिहास करण्याचा संकल्प भाजपच्यावतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे निर्सगाचा ऱ्हास होणार नाही. आणि पृथ्वीवर ऑक्सिजनही वाढेल. मानवला भरपूर ऑक्सिजन मिळेल, असे मत कर्नाटक सरकार विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांनी खानापूर तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने खानापूर येथील हिंदूनगरात सोमवारी दि. २८ रोजी आयोजित वनमहोत्सव सोहळ्याच्यावेळी व्यक्त केले.
यावेळी कर्नाटक सरकार विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांच्याहस्ते रोप लागवड करण्यात आला.
यावेळी तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, बाबूराव देसाई, धनश्री सरदेसाई, संचालक कर्नाटक राज्य वन निगम बेंगलोर सुरेश देसाई, राजेद्र रायका, कार्यदर्शि गुंडू तोपिनकट्टी, तहसीलदार रेश्मा तालिकोटी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
