बेळगाव : विकेंड लॉकडाऊन संपताच सोमवारी बाजार पेठेत तोबा गर्दी पाहायला मिळाली. दोन दिवसांच्या विकेंड लॉकडाऊननंतर सोमवारी शहरात गर्दी होणे अपेक्षितच होते मात्र आज दुपारी शहरात एकच गर्दी पहावयास मिळाली. संपूर्ण शहर रहदारीच्या विळख्यात अडकले. सोमवारी सकाळी कामकाजाच्या वेळेत सर्वत्र वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहनांची सततची वर्दळ सुरू होती त्यामुळे पादचाऱ्याना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरातील दैनंदिन व्यवहारात सुरळीत सुरू झाले त्यामुळे कामासाठी ये-जा करणाऱ्यांची संख्याही वाढली. शहराच्या विविध भागातून दाखल झालेल्या वाहनांची एकच गर्दी शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या खडेबाजार, मारुती गल्ली, गणपत गल्ली, रामदेव गल्ली आदी भागात झाल्यामुळे वाहतुकीस कोंडी निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. शहरातील अनेक रस्त्यावर वाहन संचार संथगतीने झाल्याने रहदारी पोलिसांवरचा ताण वाढला होता. बंदोबस्तामुळे सुस्तवलेल्या पोलीस यंत्रणेला वाहतूक कोंडीने शहरातील रस्त्यावर धाव घ्यायला लावली. वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांना विशेष परिश्रम घ्यावे लागले.
Check Also
युवा आघाडीतर्फे उद्या सैन्यात भरती झालेल्या जवांनाचा सत्कार
Spread the love बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीच्या वतीने उद्या बुधवार दिनांक …