बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातील धर्मवीर संभाजी महाराज मूर्ती परिसरातील सुशोभिकरणाचे काम मागील वर्षी 6 जूनला सुरूवात झाली होती. येथील बांधकामाचे काम कोरोनाच्या महामारीच्या संकटामुळे आणि कंत्राटदारामुळे काम संथगतीने सुरू होते.
शुक्रवारी हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अनिल बेनके यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आमदारांनी त्वरित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून खरडपट्टी केल्यानंतर कंत्राटदाराची चूक असल्यामुळे निधी वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे काम धिम्यागतीनं सुरू झालं होत यासंबंधी आमदार अनिल बेनके यांनी अधिकारी आणि कंत्राटदाराला आजपासून काम करण्याचे आदेश दिले.
यावेळी बुडा कार्यालयाचे व्ही. एस. हिरेमठ, मनपाचे अभियंता सचिन कांबळे, कंत्राटदार श्रीधर नागोजीचे, सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधव, उपाध्यक्ष श्रीनाथ पवार, राहुल जाधव, सरचिटणीस प्रसाद पवार, राजन जाधव, शिवसेनेचे बंडू केरवाडकर, प्रवीण तेजम, प्रकाश राऊत, यासह अन्य उपस्थित होते.