Saturday , July 27 2024
Breaking News

“तो” दिशादर्शक पुन्हा दिमाखात उभा

Spread the love

बेळगाव : सुळगा-येळ्ळूर मार्गावरील मराठी भाषेतील दिशादर्शक फलकाची काही समाजकंटकाकडून नासधूस करण्यात आली होती. रविवारी सकाळी हा प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनास आला होता. परंतु सोमवारी सकाळी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांच्या पुढाकाराने तो फलक पूर्ववत बसविण्यात आला आहे.

येळ्ळूर -सुळगा मार्गे बेळगावहून खानापूर तसेच इतर भागातून ये-जा करणाऱ्यांची नेहमीच वर्दळ असते, त्यामुळे या रस्त्यावर दिशादर्शक फलक बसविण्याची आवश्यकता होतीच त्यामुळे जि. पं. सदस्य रमेश गोरल यांच्या पुढाकाराने देसुर येथील सामाजिक कार्यकर्ते रणजित पोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मागील आठवड्यात सुळगा येळ्ळूर क्रॉसवर मराठी भाषेतील दिशादर्शक फलक बसविला होता परंतु मराठी भाषेची कावीळ असलेल्या काही समाजकंटकांनी सदर फलकास काळे फासून फलक उचकटून टाकल्याचा निंदनीय प्रकार केला असल्याचे रविवारी सकाळी निदर्शनास आले. सदर प्रकाराबद्दल मराठी भाषिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. परंतु सोमवारी सकाळी जि. पं. सदस्य रमेश गोरल यांच्या नेतृत्वाखाली सदर फलक पूर्ववत बसविण्यात आला आहे त्याबद्दल मराठी भाषिकातून समाधान व्यक्त होत आहे.

याप्रसंगी ग्रा. पं. सदस्य पंकज घाडी, सतीश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते रणजित पोटे, अजित देशपांडे, गिरीश गोरे, वैभव जोशी, विनोद पाटील, बाळू काळसेकर, बसवंत कदम, मनोहर शिंदे, अरुण कळसेकर, राजू जलगेकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना रमेश गोरल म्हणाले की, सुळगा- येळ्ळूर रस्त्यावर दिशादर्शक फलक नसल्यामुळे प्रवाश्यांची गैरसोय होत होती. बांधकाम खात्याला वारंवार निवेदने देऊनही या रस्त्याला दिशादर्शक फलक बसविण्यात आले नव्हता. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते रणजित पोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा मराठी भाषेतील दिशादर्शक फलक बसविला होता. प्रवाश्यांची गैरसोय टाळण्यासाठी बसविण्यात आला होता. लवकरात लवकर कायमस्वरूपी दिशादर्शक फलक बसविण्याची विनंती संबंधित खात्याकडे आपण करणार असल्याचे रमेश गोरल यांनी सांगितले.
कन्नड संघटना मराठी भाषिकांना नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने त्रास देत असतात. कोरोना काळात लॉकडाऊन असल्याने या संघटनांच्या उचापती बंद होत्या मात्र दैनंदिन व्यवहार सुरू होताच मराठी भाषिक फलकाना लक्ष करून उचापती करणे पुन्हा सुरू झाले आहे आणि यांच्या या कारनाम्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी जाणूनबुजून दुर्लक्ष करताना दिसत आहेत त्यामुळे मराठी भाषिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मराठी फलकाना लक्ष करणाऱ्या या कानडी संघटनाना वेळीच आवर घाला अन्यथा मराठी भाषिक रस्त्यावर उरतल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

मुसळधार पावसामुळे कडोली येथे घर कोसळले!

Spread the love  कडोली : बेळगाव तालुक्यातील कडोली गावात बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे जुने घर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *