Sunday , September 20 2026
Breaking News

एसएसएलसी परीक्षा वेळापत्रक जाहीर; 19 आणि 22 जुलै रोजी

Spread the love

बेळगाव (प्रतिनिधी) : मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेल्या एसएसएलसी परीक्षेसाठी परीक्षा मंडळाने आता दि.19 आणि 22 जुलै अशा तारखा निश्चित केल्या आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र दिनांक 30 जून पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे असे कळविण्यात आले आहे.

दि. 19 रोजी आणि 22 सकाळी साडेदहा ते दुपारी 1.30. या वेळेत या परीक्षा होणार आहेत. यासंदर्भातील घोषणा राज्याचे शिक्षण मंत्री सुरेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत केली. 19 रोजी समाज विज्ञान गणित आणि विज्ञान या विषयांच्या परीक्षा होणार आहेत. तर दिनांक 22 रोजी सर्व भाषा विषयांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. परीक्षा योग्य रीतीने पार पाडण्यासाठी विशेष सूचना आणि मार्ग सूची तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील योग्य खबरदारी घेऊन घेण्यात येणार आहेत. शाळा सुरू होण्याच्या संदर्भात मात्र तज्ञांशी चर्चा करून नंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सुरेश कुमार यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

इस्कॉनमध्ये राधाष्टमी उत्साहात साजरी

Spread the love  बेळगाव : इस्कॉन चळवळीत श्रीमती राधा राणी यांचा जन्मदिन हा राधाष्टमी उत्सव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *